DataMap — India Local News

इथे वडिलांचं निधन, तिथे ‘बाघा’ने ‘तारक मेहता..’मध्ये रडत रडत सीन्स केले पूर्ण

, MH

इथे वडिलांचं निधन, तिथे ‘बाघा’ने ‘तारक मेहता..’मध्ये रडत रडत सीन्स केले पूर्ण

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत बाघाची भूमिका साकारणारा अभिनेता तन्मय वेकारिया नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या आयुष्यातील सर्वांत कठीण काळाविषयी व्यक्त झाला. • तो सेटवर असतानाच त्याच्या वडिलांच्या निधनाची बातमी त्याला समजली. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत बाघाची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता तन्मय वेकारिया सध्या त्याच्या खासगी आयुष्यात कठीण काळाचा सामना करत आहे. • गेल्या पंधरा वर्षांपासून तो या मालिकेत काम करतोय. • प्रेक्षकांकडूनही त्याला प्रचंड प्रेम मिळालं. • मात्र वैयक्तिक आयुष्यात अचानक आलेल्या वादळानंतर कामावरही परिणाम झाल्याचं तन्मयने सांगितलं आहे.

Originally reported by TV9 Marathi · Latest.