DataMap — India Local News

ज्यांच्याकडे 2000 ची नोट त्यांना लागणार मोठी लॉटरी; होणार मालामाल, आरबीआयची सर्वात मोठी घोषणा

· Mumbai, MH

ज्यांच्याकडे 2000 ची नोट त्यांना लागणार मोठी लॉटरी; होणार मालामाल, आरबीआयची सर्वात मोठी घोषणा

नोटी बंदीची घोषणा केल्यानंतर जुन्या 500 आणि 1 हजार रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या, त्यानंतर दोन हजार रुपयांची नोट चलनात आली. • परंतु त्यानंतर दोन हजार रुपयांची नोट बनवणं देखील बंद करण्यात आलं, आता या नोटीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 2016 मध्ये देशात नोटबंदीची घोषणा करण्यात आली होती. • या नोटबंदी अंतर्गत देशात जेवढ्या काही जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा होत्या, त्या रद्द करण्यात आल्या होत्या. • त्यानंतर मार्केटमध्ये 100, 200, 500 आणि 2000 हजार रुपयांच्या चलनी नोटा आणण्यात आल्या. • त्यामध्ये सध्या मार्केटमध्ये 100, 200 आणि 500 रुपयांच्या नोटा अजूनही सुरू आहेत, परंतु सरकारने दोन हजार रुपयांची नोट तयार करणं बंद केलं आहे, एवढंच नाही तर बाजारातून देखील सर्व दोन हजार रुपयांच्या नोटा मागे घेण्यात आल्या आहेत.

Originally reported by TV9 Marathi · Mumbai.