DataMap — India Local News

शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत संतापले, गद्दार म्हणाले; आता, एकनाथ शिंदेंचा पलटवार, राष्ट्रवादीचेही उत्तर

· Mumbai, MH

शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत संतापले, गद्दार म्हणाले; आता, एकनाथ शिंदेंचा पलटवार, राष्ट्रवादीचेही उत्तर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांनी बुधवारी विधानसभेत सीमाप्रश्नासंदर्भातील बैठकीला हजेरी लावली. • या बैठकीनंतर राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक त्यांनी घेतली. • विशेष म्हणजे, शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात त्यांनी ही बैठक घेतली, त्यावेळी, एकनाथ शिंदेंनी शरद पवारांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. • मात्र, या भेटीनंतर शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट नाराजी व्यक्त केली. • ज्या गद्दाराने आपले सरकार पाडले, त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन अशाप्रकारच्या बैठका घेतल्या तर यामुळे मोठ्या नेत्याची विश्वासार्हता कमी होते, असे राऊत यांनी म्हटले.

Originally reported by ABP Majha · Maharashtra.