Bhandara Child Accident | भंडाऱ्यात भरधाव ट्रॅक्टरची विद्यार्थ्याला धडक, चालकाचा शोध सुरू | N18S
· Kolhapur, MH
भंडारा जिल्ह्यातील पालांदूर येथे शाळा सुटल्यानंतर घरी जात असलेल्या 10 वर्षीय विद्यार्थ्याला भरधाव ट्रॅक्टरने धडक दिली. • या भीषण अपघातात सहावीत शिकणारा ऋतिक जांभूळकर गंभीर जखमी झाला असून त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. • त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. • अपघाताचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. • घटनेनंतर पालांदूर पोलिसांनी तपास सुरू केला असून ट्रॅक्टर चालक आणि वाहनाचा शोध सुरू आहे.
Originally reported by News18 Marathi.