DataMap — India Local News

Maharashtra ATS : पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टीशी कथित संपर्क प्रकरणी महाराष्ट्र ATSची मोठी कारवाई; राज्यभरात एकाच वेळी 150 हून अधिक ठिकाणी छापे

· Aurangabad, MH

Maharashtra ATS : पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टीशी कथित संपर्क प्रकरणी महाराष्ट्र ATSची मोठी कारवाई; राज्यभरात एकाच वेळी 150 हून अधिक ठिकाणी छापे

Maharashtra ATS : पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टी (Shahzad Bhatti) याच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून कथित संपर्कात असलेल्या व्यक्तींविरोधात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) मोठी कारवाई सुरू केली आहे. • या कारवाईअंतर्गत राज्यभरातील 150 हून अधिक ठिकाणी एकाच वेळी शोधमोहीम (Search Operation) सुरू केलं आहे. • यामध्ये मुंबई, ठाणे , कुर्ला, वांद्रे, जोगेश्वरी, नवी मुंबई , मीरा रोड, भाईंदर, सांगली, सातारा , छत्रपती संभाजीनगर तसेच अन्य अनेक ठिकाणी ATSचे (Maharashtra ATS Raids) छापे सुरू आहेत. • प्राथमिक माहितीनुसार, पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी सोशल मीडियाद्वारे कथित संपर्क असल्याच्या संशयावरून 150 हून अधिक व्यक्ती ATSच्या रडारवर असून, त्याच अनुषंगाने ही व्यापक शोधमोहीम राबविण्यात येत आहे. • दरम्यान या शोधमोहीम संदर्भात अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी या सर्च ऑपरेशनचा चर्चेनं एकच खळबळ उडाली आहे .

Originally reported by ABP Majha · Mumbai.