Satara Rain | साताऱ्यात मुसळधार पावसाचा इशारा! कोयना धरण निम्मे भरले; शाळांना सुट्टी | N18V
· Kolhapur, MH
सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. • त्यामुळे कराड आणि पाटण तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. • सलग पाच दिवस सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कोयना धरण निम्मे भरले असून जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागला आहे. • मात्र काल झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे अनेक भागांत नुकसान झाले असून नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. • साताऱ्यातील सद्यस्थितीचा सविस्तर आढावा पाहा.
Originally reported by News18 Marathi.