Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
· Mumbai, MH
मुंबई : विधिंमडळ अधिवेशनात विधानसभेत भास्कर जाधव (Bhaskar jadhav) यांनी सभागृहात मंत्री उपस्थित नसतात, यावरुन प्रश्न उपस्थित करत सरकारला धारेवर धरले. • तर, भास्कर जाधव यांच्या आक्षेपावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी उत्तर देताना भास्कर जाधवांना टोला लगावला. • सभागृहात दोन दोन कॅबिनेट मंत्री उपस्थित आहेत, ज्या विषयावर चर्चा आहे, त्या विभागाचे राज्यमंत्री उपस्थित आहेत. • पण, ज्यांना विरोधीपक्ष नेते व्हायची आस लागली आहे, त्यांना राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री कोण आहेत? • हेच माहिती नाही, असे म्हणत अतुल भातखळकर (BJP) यांनी भास्कर जाधवांना लक्ष्य केलं.
Originally reported by ABP Majha · Maharashtra.